“पिंपरी चिंचवड मधील ५००/७०० कोटींचा घोटाळाही उघड करा” संजय राऊतांच सोमय्याना पत्र
पिंपरी चिंचवड।२१ ऑक्टोबर लोकवार्ता –
संजय राऊतांनी बुधवारी किरीट सोमय्या यांना एक पत्रच पाठवलं आहे. यामध्ये पिंपरी-चिंचवडमध्ये ५०० ते ७०० कोटींचा घोटाळा झाल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. स्मार्ट सिटी अंतर्गत हा घोटाळा झाला, ईडी, सीबीआय चौकशीसाठी सोमय्यांनी पुढाकार घ्यावा. असं संजय राऊत यांनी पत्राद्वारे आवाहन केलं आहे. तसेच, पत्रातील माहितीच्या आधारे सोमय्या ईडीकडे घोटाळ्याच्या चौकशीसाठी पाठपुरवा करतील, अशी अपेक्षा देखील संजय राऊत यांनी व्यक्त केलेली आहे.
संजय राऊत आपल्या पत्रात म्हणतात, सर्वच ठिकाणचे घोटोळे उघड करणारे व्यक्ती म्हणून तुम्ही तुमची ओळख निर्माण केली आहे. मागील अनेक वर्षांपासून तुम्ही हे करत आहात. सरकारी पैसा आणि मालमत्तेचा गैरवापर करणाऱ्यांना शोधून काढण्यासाठी तुम्ही कष्ट घेतले. खरं तर, अनेक सरकारी कर्मचारी आणि राजकीय नेत्यांना तुम्ही त्यांची भ्रष्टाचाराची प्रकरण उघड केल्यानंतर तुरुंगात जावं लागलं आहे.
“मी घोषणा केली होती की भाजपासंदर्भातली १०० नावं मी अशी देईन ज्यांच्यावर ईडी आणि सीबीआयनं कारवाई करायला हवी. हे त्यातलं पहिलं नाव आहे. अजून ९९ नावं पुराव्यांसह देणार मी. हे त्या १०० जणांच्या यादीतलं १००वं नाव आहे. आता मी सुरुवात करेन. मला बघायचंय की कारवाई होणार की नाही. यात सगळे प्रमुख लोक आहेत. सगळे भ्रष्टाचाराच्या गंगेत डुबक्या मारत आहेत हे सगळं माझ्याकडे आहे. मी ते देणार”, असा इशाराच संजय राऊत यांनी दिला आहे”.
https://lokvarta.in/wp-admin/post.php?post=10927&action