उत्तराखंडच्या राज्यपालांनी केले उद्योजक संतोष बारणे यांच्या सामाजिक कार्याबद्दल विशेष कौतुक
राज्यपाल म्हणून लेफ्टनंट गुरमीत सिंग यांच्याकडे मोठे व्हिजन

लोकवार्ता । प्रतिनिधी
उतराखंड राज्याचे नवनियुक्त राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांनी नुकतीच राजभवनात उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून शपथ घेतली. विशेष म्हणजे या शपथविधी कार्यक्रमाला महाराष्ट्रातून कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बारणे यांना उपस्थित राहण्याची संधी मिळाली. बारणे यांच्या कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणाऱ्या आरोग्य सेवेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी बारणे यांचे कौतुक केले.
उत्तराखंड राजभवन येथे आयोजित कार्यक्रमात लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांना पदाची शपथ देण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती न्यायमूर्ती राघवेंद्रसिंह चौहान यांनी ही शपथ लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांना दिली. शपथ घेतल्यानंतर राज्यपाल लेफ्टनंट जनरल एस. गुरमीत सिंह भारतीय सैन्याच्या चौथ्या मराठा बटालियन रेजिमेंटने दिलेल्या गार्ड ऑफ ऑनरची पाहणी केली. मुख्य सचिव एस एस संधू यांनी कार्यक्रमाचे संचालन केले. तत्पूर्वी मुख्य सचिव श्री एस एस संधू यांनी भारताच्या राष्ट्रपतींनी जारी केलेले ऑर्डर वाचली. त्यानुसार सेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांची उत्तराखंडचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी राज्याचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांच्यासह इतर मान्यवर आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
शपथ घेतल्यानंतर माध्यमांशी अनौपचारिकपणे बोलत अस ताना, राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंह यांनी आपली प्राथमिकता सांगितली. ते म्हणाले की “राज्यातील महिला स्वयंपूर्ण आणि शूर आहेत, अशा स्थितीत येथील मुलांना सैनिक शाळा, एनडीएसाठी प्रेरित करून राज्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला जाईल”.
बारणे कुटुंबियांना विशेष सन्मान
या शपथविधी सोहळ्यात महाराष्ट्र राज्यातील पिंपरी चिंचवड शहरातील कर्तव्यम सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष संतोष बारणे आणि लेखक क्रांतिकुमार महाजन यांचा संपूर्ण कुटुंबासह सन्मान करण्यात आला. त्याचबरोबर शपथविधी सोहळा संपताच राज्यपाल व संतोष बारणे यांनी त्यांना त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह रात्रीच्या जेवणासाठी आमंत्रित केले.

राज्यपाल गुरमित सिंह यांनी विशेषतः शिर्डीतून साईबाबांची मूर्ती, प्रसाद, पवित्र सिरोपा, पाटणा साहिब गुरुद्वारामधून आणून त्यांचा सन्मान केला.
कर्तव्यम सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून केल्या जाणान्या आरोग्य सेवेच्या क्षेत्रात केलेल्या कार्याबद्दल राज्यपालांनी बारणे यांचे कौतुक केले.
यावेळी लेखक क्रांतिकुमार महाजन, आशा महाजन, माधुरी बारणे, हरभजनसिंग अरोरा, जसविंदरसिंग अरोरा (झारखंड), योगमाता राजेश्री देसाई (गुजरात), आशिष श्रीवास, प्रशांत साहेत, प्रति साहेत, प्रार्थना बारणे आदी उपस्थित होते.
राज्यपाल म्हणून लेफ्टनंट गुरमीत सिंग यांच्याकडे मोठे व्हिजन – बारणे
याबाबत बोलताना संतोष बारणे म्हणाले, उत्तराखंड राज्याचे नवनियुक्त राज्यपाल लेफ्टनंट जनरल गुरमीत सिंग यांच्याकडे राज्यपाल म्हणून मोठे व्हिजन आहे. त्यांनी शपथ घेताना सांगितले की “राज्यातील महिला स्वयंपूर्ण आणि शूर आहेत, अशा स्थितीत मुलींना सैनिक शाळा, एनडीएसाठी प्रेरित करून राज्यात महिला सक्षमीकरणाचा नवा अध्याय लिहिला गेला पाहिजे. माजी सैनिक, वृद्ध पालक आणि सैनिकांचे कुटुंबही मोठ्या संख्येने उत्तराखंडमध्ये आहेत. त्यांचे आरोग्य, पेन्शनशी संबंधित समस्यांचे निराकरण, माजी सैनिक अंशदायी आरोग्य योजना सुविधा माझ्या प्राधान्य आहेत. यातून त्यांची पालकत्व स्वीकारन्याची तयारी दिसते. आज याच गोष्टींची आवश्यकता आहे.
