पंकजा मुंडे यांना डावलून उमा खापरे यांची लॉटरी
-विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे उमेदवारांची नाव जाहीर.
पुणे । लोकवार्ता
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपतर्फे उमेदवारांची नाव जाहीर करण्यात आली आहे.भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने उत्तर प्रदेश, महाराष्ट्र तसेच बिहार या तिन्ही राज्यातील आगामी विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक-2022 साठीची नाव जारी केली आहेत. यात महाराष्ट्रातील या पाच नावावर शिक्कामोर्तब झाले आहे. पंकजा मुंडे, चित्रा वाघ यांची नाव चर्चेत असताना भाजपकडून उमा खापरे यांची वर्णी लागली आहे.

उमा खापरे या भाजप महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. पिंपरी चिंचवड महापालिकेत दोन वेळा नगरसेविका होत्या. त्यांनी पिंपरी चिंचवड महापालिकेत एकदा विरोधी पक्ष नेत्या म्हणूनही काम पाहिलं आहे. त्यांनी भाजप पुणे जिल्हा सरचिटणीस म्हणून काम पाहिलं. महिला मोर्चा पदाधिकारी, प्रदेश सरचिटणीस, प्रदेश उपाध्यक्षा ते महिला प्रदेशाध्यक्षा असा त्यांचा राजकीय प्रवास राहिला आहे. तीस वर्षांपासून भाजपच्या कट्टर समर्थक आहेत. महिला ओबीसी चेहरा म्हणून संधी दिल्याची चर्चा आहे.