एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ | LPG gas price increase
Lokvarta: एलपीजी सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ झाली. वाढत्या महागाईने होरपळलेल्या जनतेला पुन्हा एक झटका बसला आहे. घरगुती सिलिंडरच्या किमतीमध्ये मोठी वाढ केलेली आहे. (lpg gas price increase today)
आजपासून देशांतर्गत 14.2 किलो एलपीजी(LPG) सिलिंडरच्या किमतीत 50 रुपयांनी वाढ केलेली आहे. या निर्णयानंतर दिल्लीत (Delhi) घरगुती सिलिंडरसाठी 1053 रुपये मोजावे लागणार आहेत. 5 किलो घरगुती सिलिंडरच्या दरात 18 रुपयांनी वाढ करण्यात आली आहे तर 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरच्या किमतीत 8.50 रुपयांनी घट करण्यात आली आहे. त्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

घरगुती सिलिंडरच्या किमती वाढण्याची आणि व्यावसायिक सिलिंडरच्या दरात घट होण्याची ही पहिलीच वेळ आहे.1 तारखेला
व्यावसायिक सिलिंडर 198 रुपयांनी घट करण्यात आली होती.त्यानंतर आज पुन्हा 9 रुपयांनी कपात करण्यात आली आहे.किमत कमी झाल्यामुळे व्यावसायिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. नव्या दरांच्या घोषणेनंतर आता राजधानी दिल्लीत 19 किलोच्या व्यावसायिक सिलिंडरची किंमत 2,012 रुपये मोजावे लागणार आहेत.यापुर्वी यासाठी 2022 रुपये मोजावे लागत होते.