लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

मुळशी तालुक्यात 2000 शिवभक्तांच्या संख्येत निघणार ‘महादौड’

लोकवार्ता : शारदीय नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला आहे. त्यानिमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही मुळशी तालुक्यात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेच्या वतीने श्री दुर्गामाता दौड या (Durgamata Daud Mulshi) उपक्रमास प्रारंभ झाला आहे. आज घटस्थापना म्हणजे नवरात्रीचा पहिला दिवस आजच्या दिवसापासून ते दसऱ्यापर्यंत मुळशी तालुक्यातील पिरंगुट, लवळे, सुतारवाडी, ऊरवडे, घोटावडे, रिहे, पौड, भुकूम या गावांमध्ये नित्य दौड सुरू असणार आहे. तसेच, रविवारी (दि. 2 ऑक्टोबर) रोजी महादौडीचे आयोजन करण्यात आले आहे. या दौडीचे नेतृत्व भोर-मुळशी-वेल्हा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे करणार आहेत. या दौडीला अंदाजे 2000 शिवभक्तांचा समावेश असणार आहे.

महादौड

काय आहे हा उपक्रम?

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेतर्फे दरवर्षी नवरात्रीमध्ये घटस्थापना ते दसऱ्यापर्यंत सर्व जिल्ह्यात श्री दुर्गामाता दौडीचे आयोजन केले जाते. या उपक्रमात प्रत्येकी गावात पहाटे 5 वाजता, सर्व शिवभक्त एकत्र जमून दौड काढतात. स्थापित केलेल्या देवीच्या मंदिरात जाऊन देश आणि धर्मासाठी मागणे मागतात. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज आणि मावळ्यांच्या पराक्रमाचे आणि ऋणाचे स्मरण करतात.

यावेळी विविध संस्थाचे कार्यकर्ते, पक्षांचे पदाधिकारी आणि नेते मंडळी तसेच विविध जातीचे, संघटनेचे, पंथाचे लोक जातीपातीचा भेद बाजूला ठेऊन या उपक्रमात सहभागी होतात. सफेद कपडे, कंबरेला शेला आणि डोक्यावर फेटा असा मराठी सांस्कृतिक पेहराव करून सर्व गावातील लहान-मोठे सगळेजण या दौडीत उत्साहाने सहभागी होतात. भगव्या ध्वजाचा मान हा शासकीय अधिकारी, नेते, सैनिक, पोलीस अधिकारी यांना मोठ्या आदराने दिला जातो. समाजाचे नेतृत्व करणारे म्हणून दौडीचे नेतृत्व करणारा ध्वज त्यांच्या हाती देण्याची प्रथा मानली जाते.

मुळशी तालुक्यात निघते मोठी दौड : Durgamata Daud Mulshi

मुख्यत्वे महाराष्ट्रात सांगली, कोल्हापूर, बेळगाव अशा ठिकाणी हजारोंच्या संख्येने दौड निघते. या सोबतच मुळशी तालुक्यातील दौडीची संख्याही हजारोंच्या घरात असते. यंदा मुळशी तालुक्यात 2 ऑक्टोबर रोजी अंदाजे 2000 संख्येने महादौड निघणार असल्याचे स्थानिक धारकऱ्यांनी सांगितले. ही महादौड पिरंगूट कॅम्प या ठिकाणापासून सुरु होणार असून ऐतिहासिक तुळजाभवानी मंदिर घोटावडे फाटा या ठिकाणी समारोप करण्यात येणार आहे.

या दौडीचे नेतृत्व भोर-मुळशी-वेल्हा या मतदारसंघाचे विद्यमान आमदार संग्राम थोपटे करणार आहेत. या दौडीमध्ये (Durgamata Daud) सर्वांनी जात-पात विसरून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचे स्मरण करण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मुळशी विभागाच्या प्रमुखांनी केले आहे.

news source : mpc news

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani राष्ट्रीय पत्रकार दिवस जाणून घ्या इतिहास National Press Day 2022 महाराष्ट्रातील 5 श्रीमंत घराणी | top 5 richest person in india पंडित नेहरू यांच्या जयंतीदिनी का साजरा केला जातो बालदिन ? | children day 2022 छत्रपती शिवाजी महाराजांच्या 5 महत्वाच्या लढाया | chhatrapati shivaji maharaj