“महावितरण कार्यालयावर महाजन आंदोलन”
नगरसेवक रवी लांडगे व सामाजिक कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांच्या उपस्तिथीत हे आंदोलन पार पडणार आहे.
पिंपरी। लोकवार्ता-
भोसरीतील प्रभाग क्र ६ मध्ये वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठा चा जाब विच्यारण्यासाठी महावितरणाविरोधात हे आंदोलन काढण्यात येणार आहे.आपल्याला अंधारात ठेवणाऱ्या महावितरणाला याचा दणका आणि हिसका दाखवायचा,त्यासाठी सर्वानी या आंदोलनांमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन नगरसेवक रवी लांडगे आणि कार्यकर्त्या सोनाली उदावंत यांनी केले.

भोसरीतील कै. अंकुशराव लांडगे सभागृह येथून गुरुवारी सकाळी 10 वाजता मोर्चाला सुरुवात होणार आहे. तेथून बालाजीनगर गवळी माथा येथील महावितरणच्या कार्यालयावर मोर्चा धडकणार आहे. नगरसेवक रवी लांडगे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा काढण्यात येणार आहे.
वारंवार खंडित होणा-या विद्युत पुरवठ्याला जबाबदार कोण, प्रभागात वारंवार विज जाते. आम्ही वेळेवर बिले भरतो आणि आमचा हरिपाठ, काकडा चालू असतानाही विज जाते. याला जबाबदार कोण? दररोज सकाळी विज जाते. त्याचा जाब विचारण्यासाठी येत्या गुरुवारी महावितरणच्या कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे. आपणच आपल्या हक्कासाठी लढूयात, सर्वांनी गुरुवारी एमएसईबी विरोधात होणा-या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन नगरसेवक लांडगे यांनी केली आहे.