आज संध्याकाळी साडे सात वाजता एकनाथ शिंदे घेणार मुख्यमंत्री पदाची शपथ
लोकवार्ता : ही लढाई तत्वांची, हिंदुत्वाची आहे. ही बाळासाहेबांच्या विचारांचा विजय आहे. असं म्हणत आज एकनाथ शिंदे यांचा संध्याकाळी साडे सात वाजता शपथ विधी होणार आहे. या शपथ विधीत भाजपचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित असतील.

शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांच्या सत्ता संघर्षाचा शेवट भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. एकानाथ शिंदे हे महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदी विराजमान होतील अश्ली घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. आज सायंकाळी साडे सात वाजता एकनाथ निंदे एकटेच मुख्यमंत्री पदाची शपथ घेतील, असेही देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
शिंदे यांच्या नेतृत्वात शिवसेनेचा विधीमंडळ गट, भाजप आणि १६ अपक्ष आमदार एकत्रं आले आहेत. अजून काही लोक येत आहेत. या सर्वांचं पत्रं आम्ही राज्यपालांना दिलं. आम्ही सत्तेच्या पाठिमागे नाही. मुख्यमंत्रीपदासाठी आस नाही. ही तत्वांची
लढाई. हिंदुत्वाची लढाई आहे. विचारांची लढाई आहे. त्यामुळे आज साडे सात वाजता शिंदे हे मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील. एकट्याचाच शपथ विधी होईल.