महाराष्ट्र राज्य व्यवसायिक उद्योजक पुरस्कार २०२३ पार; YouthClub satrtup चे करण्यात आले अनावरण
लोकवार्ता : मंगळवार (दि. ३) रोजी पिंपरीतील ऑटो क्लस्टर येथे दिग्गज व्यवसायिकांचा सन्मान सोहळा पार पडला. महाराष्ट्रतील उद्योजक आणि व्यवसायिक यांच्यासाठी शासकीय आणि सरकारी योजना आणि बँकिंग मार्फ़त योगदान देत आहे. तसेच नवीन युवा उदयोजक तयार तयार करण्याचे कार्य आता YouthClub satrtup मार्फ़त केले जात आहे. त्याचे आज अनावरण करण्यात आले. महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघटना यांच्या वतीने नुकताच महाराष्ट्र राज्य व्यवसायिक उद्योजक पुरस्कार 2023 संपन्न झाला.

प्रमुख अतिथी म्हणून पी डी रेंदाळकर महाव्यवस्थापक , पुणे जिल्हा उद्योग केंद्र. महाराष्ट्र शासन, सागर वाघमोड़े साइबर सिक्योरिटी अधिकारी महाराष्ट्र शासन, विवेक इनामदार ज्येष्ठ पत्रकार MPC News, पैलवान भरत लिमन (सिने कलाकार व राष्ट्रीय सुवर्ण पदक विजेते) सुनिता पाटसकर संस्थापक – स्पार्क इंजिनिअरिंग, श्री. सुनील हिरूरकर सहाय्यक पोलीस महानिरीक्षक, एमटी, महाराष्ट्र राज्य, पुणे हे लाभले. तसेच अभिलाषा बेलूर, अर्चना सस्ते, आप्पा राक्षे, कांचन करंजकर, कामिनी खरात, गीतांजली क्षीरसागर, चांदणी निरंजन, जितेंद्र बल्लाडकर, ज्योती पोतुलवार, दिशा कदम, नीता कुशारे, पल्लवी शिवकुमारश्री, प्रीती क्षीरसागर, रघुनाथ तापकीर, संतोष पवळे, वर्षा धारणे, वैशाली गवळी, शैला इंगळे, श्वेता सक्सेना, संदीप बेलसरे, सोनम थिगळे, शोभा क्षीरसागर, स्मिता खामकर, कृष्णा राऊत, रोशन मराठे यांना पुरस्कार देण्यात आले.
महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघटना अध्यक्ष तृप्ती रामाने यांनी संघटनेच्या कामाबद्दल माहिती दिली. सूत्रसंचालन निलेश पडवळ तसेच महाराष्ट्र राज्य व्यवसायिक संघटना सचिव अनिता डफळ यांनी आभार व्यक्त केले.