महाविकास आघाडीचा फॉर्म्युला ठरला! पाहा सर्वाधिक जागा कुणाला?
लोकवार्ता : महाविकास आघाडीने आगामी लोकसभा निवडणूक एकत्रच लढवण्याचा निर्णय घेतला आहे. एवढेच नव्हे तर महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. त्यानुसार शिवसेनेला सर्वाधिक जागा मिळणार आहेत. तसेच आपआपल्या कोट्यातूनच मित्र पक्षांना जागा देण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

आगामी लोकसभा निवडणूक अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. सर्वच राजकीय पक्षांनी यासाठी जोरदार तयारी सुरु केली आहे. महाविकास आघाडीने लोकसभा निवडणूक एकत्रच लढण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा फॉर्म्युलाही ठरला आहे. या फॉर्म्युल्यानुसार 48 जागांपैकी ठाकरे गटाला 21, राष्ट्रवादीला 19 आणि काँग्रेसला 8 जागा मिळणार आहेत.
या जागा कोणत्या असतील हेही आघाडीने ठरवलं आहे. या शिवाय आपापल्या मित्रपक्षांना स्वत:च्या कोट्यातून जागा द्याव्यात असंही महाविकास आघाडीचं ठरलं आहे. त्यामुळे वंचित बहुजन आघाडीला ठाकरे गटाच्या कोट्यातून जागा मिळणार आहे. वंचितला महाविकास आघाडीत स्थान मिळणार नसल्याचं सध्याचं चित्र आहे.