महाविकास आघाडीचे माझ्यासमोर शुल्लक आव्हान; अश्विनी जगताप
लोकवार्ता : चिंचवड विधानसभा पोटनिवडणूक अत्यंत चुरशीची होणार आहे. भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर मविआकडून राष्ट्रवादीचे नेते नाना काटे यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर ठाकरे गटाचे बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे यांनी देखील उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्यामुळे या निवडणूकीकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. यापार्श्वभूमीवर भाजप उमेदवार अश्विनी जगताप यांनी महाविकास आघाडीचे माझ्यासमोर शुल्लक आव्हान आहे, असं वक्तव्य केलं आहे.

गेल्या तीस वर्षांपासून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप आणि माझ्यावर प्रेम करणारी जनता असल्याने माझा विजय नक्की होईल. त्यामुळे महाविकास आघाडीचे माझ्यासमोर शुल्लक आव्हान आहे, असा विश्वास भाजपच्या उमेदवार अश्विनी जगताप यांनी व्यक्त केला आहे.
मतदारांची सकाळी घरोघरी भेट घेत आहे. रात्री कोपरा सभा घेऊन जेष्ठ नागरिकांसोबत संवाद साधत आहे. नवी सांगवी, जुना सांगवी हा आमचा बालेकिल्ला आहे. लोक म्हणत आहेत इथली चिंता करू नका, इतर ठिकाणी प्रचार करा. लोकांचा खूप प्रतिसाद आहे. माझ्यासमोर बंडखोर अपक्ष उमेदवार राहुल कलाटे आणि महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार नाना काटे यांचे शुल्लक आव्हान आहे. लोकांचे गेल्या तीस वर्षांपासून साहेबांवर असलेले प्रेम बघता मला कसलीही भीती वाटत नाही, असं अश्विनी जगताप म्हणाल्या.