पुण्यासह १४ महापालिका निवडणुकांना वेग; अंतिम मतदार यादी ९ जुलै ला प्रसिद्ध
पुण्यासह १४ महापालिका निवडणुकांना आता वेग आलेला आहे. २३ जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत.
लोकवार्ता : पुण्यासह १४ महापालिका निवडणुकांना आता वेग आलेला आहे. २३ जूनला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. हरकती आणि सूचनांसाठी १ जुलै पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. अंतिम मतदार यादी ९ जुलै ला प्रसिद्ध होणार आहे.

राज्यातील इतर मागासवर्गीयांच्या आरक्षणाचा प्रश प्रलंबित असताना देखील निवडून प्रक्रियेला वेग आला आहे. मुदत संपलेल्या १४ महापालिकेच्या निवडणुकीसाठी गुरुवारी प्रारूप याद्या प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. मुंबई, कल्याण, ठाणे, नवी मुंबई, उल्हासनगर, वसई-विरार, पुणे, पिंपरी-चिंचवड, सोलापूर, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर या १४ मुदत संपलेल्या महापालिकांच्या निवडणूका होणार आहेत. अंतिम यादी ९ जुलै ला प्रसिद्ध होणार असून १ जुलै पर्यंत हरकती आणि सूचनांची मुदत देण्यात आली आहे.