लोकप्रतिनिधी अनेक पण, काम करण्याची धमक काहींमध्येच : आमदार महेश लांडगे
– बोऱ्हाडेवाडी येथील कार्यक्रमात नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्याबद्दल गौरवोद्गार
– भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम
पिंपरी। लोकवार्ता-
राजकीय क्षेत्रात लोकप्रतिनिधी म्हणून अनेकजण काम करत असतात. परंतु, काम करण्याची धमक काहींमध्येच असते आणि ती धमक मला नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांच्यामध्ये दिसते, असे गौरवोद्गार भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांनी काढले.
बोऱ्हाडेवाडी येथे सारिका बोऱ्हाडे आणि नितीन बोऱ्हाडे यांच्या वतीने आमदार महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानिमित्ताने आमदार लांडगे बोलत होते.
यावेळी लांडगे यांनी सारिका बोऱ्हाडे करत असलेल्या सामाजिक कार्याविषयी समाधान व्यक्त केले. आठवीच्या पुढील शाळा सुरू व्हाव्यात यासाठी त्या करत असलेले प्रयत्न कौतुकास्पद आहे. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा पुतळा उभा करण्यासाठी सुरू असलेले प्रयत्न असतील यासारख्या कार्यातून सारिका बोऱ्हाडे या सर्वांना अभिमान वाटेल, असे काम करत आहेत, असेही आमदार लांडगे म्हणाले.

कार्यक्रमासाठी फ- प्रभाग अध्यक्ष कुंदन गायकवाड, नगरसेविका अश्विनी जाधव, साधना मळेकर, वसंत बोराटे, निर्मला गायकवाड, स्वीकृत नगरसदस्य संतोष मोरे, दिनेश यादव, तसेच सामाजिक कार्यकर्ते वंदना अल्हाट, हिरामण आल्हाट, राजेश सस्ते, संभाजी बोऱ्हाडे, पांडुरंग बोऱ्हाडे आदी उपस्थित होते.
नागरिकांसाठी काम करणे हे भाग्यच…
नगरसेविका म्हणून काम करताना नागरिकांच्या सुविधा, त्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी काम करण्याची संधी मला आमदार महेश लांडगे यांच्यामुळे मिळाली. नागरिकांच्या हिताची कामे करणे हे मी माझे भाग्य समजते. अशा भावना यावेळी नगरसेविका सारिका बोऱ्हाडे यांनी व्यक्त केल्या.