लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

खासदार संभाजीराजेंच्या नेतृत्त्वात नाशिकमध्ये मराठा मूक आंदोलन

भुजबळांनी संभाजीराजेंचं कौतुक केलं

लोकवार्ता । प्रतिनिधी

नाशिक : मराठा आरक्षणासाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्त्वात नाशिकमध्ये मराठा मूक आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाला पालकमंत्री छगन भुजबळ, कृषीमंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्याक्ष नरहरी झिरवळ, सदाभाऊ खोत उपस्थित होते.

http://silversakshi.in/
http://silversakshi.in/

‘मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून संभाजीराजे अतिशय चांगला काम करत आहेत म्हणत छगन भुजबळांनी संभाजीराजेंचं कौतुक केलं आहे. संभाजी महाराज सगळ्यांना सोबत घेऊन जायची भूमिका घेतली या बद्दल त्यांचे अभिनंदन करतो.’

कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे अशी भूमिका यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ यांनी मांडली. आपण कधीही मराठा आरक्षणाला विरोध केलं नसल्याचंही त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

‘मराठा समजला आरक्षणाला मिळालं पाहिजे यात दुमत नाही. मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी माझ्या पक्षाच देखील भूमिका आहे. छत्रपती, शाहू,महात्मा फुले हे आमचे दैवत आहेत. संभाजी महाराज हे नेतृत्व करत आहेत याचा मला अभिमान आहे.’

‘एकमेकांसोबत आपल्याला भांड्याचे नाही सोबत काम करायचे आहे. माझा कधीच मराठा आरक्षणाला विरोध केला नाही. मी मराठा समाजाच्या विरोधात आहे असं काही लोक कायम गैसमज पसरवत आहेत. मराठा आरक्षण मिळण्यासाठी काही अडचणी आहेत मराठा आरक्षण सुप्रीम कोर्टाने नाकारले तर OBC समाजाचं आरक्षण रद्द केलं. असंही यावेळी छगन भुजबळ म्हणाले आहेत.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani