पुणे तिथे काय उणे ! बैलगाडा शर्यतीत मराठमोळ्या ‘चिअर्स गर्ल’
-पुणे जिल्यातील खेड तालुक्यात पांगरी या गावातील घटना.
पुणे | लोकवार्ता-
‘पुणे तिथे काय उणे’ ही म्हण आज पुन्हा एकदा खरी ठरली आहे. पुणे जिल्यातील खेड तालुक्यात पांगरी या गावात बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात आले होते. चक्क या कार्यक्रमात चिअर्स गर्ल थिरकल्या. मराठमोळी पोशाख, साजशुंगारात चिअर्स गर्ल ने अदाकारी दाखवली. या अनोख्या उपक्रमामुळे बैलगाडा शर्यतीची शोभा वाढली.

मागील काही वर्षात कोरोना प्रादुर्भावामुळे निर्बंध लागू होते. नुकतेच महाराष्ट्र सरकारने बैलगाडा शर्यतीवर लावलेले निर्बंध हटवले. त्यामुळे गावभागात यात्रांचा जल्लोष चालू झाला. याच पार्श्वभूमीवर पांगरी गावात रोकडोबा महाराजांचा उत्सव पार पडला. यावेळी बैलगाडा शर्यती भरवल्या होत्या.
याप्रसंगी मराठी गाण्यांवर चिअर्स गर्ल नी ताल धरला. यासाठी स्वतंत्र स्टेज उभारण्यात आला. नऊवारी साडी, नथ असा पारंपरिक पोशाख करण्यात आला. या उपक्रमामुळे नागरिकांच्या मनोरंजनात भर पडली. त्यामुळे हा विषय आज सर्वत्र चर्चेचा विषय ठरला आहे.