मुंबईत लालबाग मधील ‘वन अविघ्न पार्क’ इमारतीला भीषण आग
लालबाग मधील वन अविघ्न पार्क ला भीषण आग;१९ व्या मजल्यावरून पडून सुरक्षारक्षकाचा मृत्यू.
मुंबई ।२२ ऑक्टोबर लोकवार्ता –

मुंबई लालबाग मधील वन अविघ्न पार्क या इमारतीला भीषण आग लागली असून अग्निशामक दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहे. अग्निशामक दलाकडून आग रोखण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.लालबाग मधील सर्वात उंच इमारतींपैकी एक असणारी हि इमारत ६० मजल्यांची असून १९व्या मजल्याला आग लागलक्याची बाब समोर आली आहे. १९व्या मजल्याला लागलेली आग हि २५व्या मजल्यावर येऊन पोहचली आहे .आग इतकी भीषण असल्याकारणामुळे आग आटोक्यात आणणे शक्य होत नाही ये.
अग्निशामक दलाला लेवल तीनचा कॉल देण्यात आला आहे. या आगीतून आपला जीव वाचवण्यासाठी लोकांची धावपळ सुरु आहे. एका नागरिकाने जीव वाचवण्यासाठी इमारतीवरून उडी मारली असून त्याचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. हि सर्व घटना आज दुपारी १२ च्या सुमारास घडली असल्याचे समोर आले आहे.
https://lokvarta.in/wp-admin/post.php?post=10973&action