माऊलींचे पालखी महामार्ग विकासास केंद्रीय मंत्री गडकरी यांना साकडे
-पालखी महामार्गातील रस्ते विकास कामाने अपूर्ण असलेल्या भागात पालखी सोहळ्यात गैरसोय टाळण्यासाठी मागणी.
आळंदी । लोकवार्ता-
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्या पूर्वी माऊलींचे पालखी महामार्गातील रस्ते विकास कामाने अपूर्ण असलेल्या भागात पालखी सोहळ्यात गैरसोय टाळण्यासाठी महामार्गावरून पालखी सोहळा जाण्यापूर्वी महामार्ग अडथळेमुक्त राहून भाविकांना सहज ये-जा करता येईल असा सुलभ व्हावा यासाठी आळंदी देवस्थानचे विश्वस्त कमेटीने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन रस्ते महामार्गावरील अडथळे दूर करण्याची मागणी केली.

महामार्ग विकासाचे शिल्पकार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची श्री संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमेटीच्या वतीने प्रमुख विश्वस्त योगेश देसाई, पालखी सोहळा प्रमुख अॅड.विकास ढगे पाटील, विश्वस्त डॉ. अभय टिळक, लक्ष्मीकांत देशमुख यांनी संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा पायी वारीस ये- जा करताना सोहळ्यास आणि भाविक, वारकरी यांना रहदारीला सोयीस्कर व्हावे तसेच मार्गावरील समस्ये मुळे सोहळ्यात गैरसोय होऊ नये यासाठी विविध मागण्यांचे निवेदन घेऊ आळंदी देवस्थानचे शिष्ठ मंडळाने केंद्रीयमंत्री नितीन गडकरी यांची भेट घेतली. यावेळी संत ज्ञानेश्वर महाराज यांची मूर्ती गडकरी यांना आळंदी देवस्थानचे वतीने भेट देत गडकरी यांचा सत्कार करण्यात आला.
संत ज्ञानेश्वर महाराज पायी वारी सोहळा आळंदी ते पंढरपूर या पालखी महामार्गा वर असलेल्या अडचणी यांची स्थळपाहणी केल्या नंतर तयार केलेले निवेदन गडकरी यांना देत विविध ठिकाणी रस्ते विकास बांधकामे सुरु असल्याने यातील अडथळे दूर करण्याची मागणी करण्यात आली. पालखी महामार्ग विकासाचे काम सुरु असून गेल्या दोन वर्षात मोजक्याच भाविकांच्या वारी झाली. मात्र यावर्षी लाखो भाविक वारीत सहभागी होत असून त्या दृढतेने अडचणी येऊ नये याची दक्षता घेऊन संबंधित विभागास वारी पूर्वी कामे उरकण्याच्या सूचना देण्याची मागणी करण्यात आली. केंद्रीय भू-पृष्ठ मंत्री
नितीन गडकरी यांचे समवेत सकारात्मक चर्चा झाली असून पालखी महामार्ग वारी दरम्यान सुरक्षित व रहदारीस सुरळीत राहील याची दक्षता घेतली जाईल अशी ग्वाही दिल्याचे संस्थान तर्फे सांगण्यात आले.