माउलींच्या चांदीच्या रथाची चाचणी यशस्वी रित्या पूर्ण
संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यात माउलींच्या चांदीच्या रथाची दुरुस्ती आणि डागडुजी पूर्ण.
आळंदी । लोकवार्ता
आतुरता लागली आहे पंढरपूर च्या वारीची. येत्या २१ तारखेला आळंदी येथून संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज पालखी
प्रस्थान सोहळा पार पडणार आहे.त्यासाठी सर्व तय्यारी सुरु झाली आहे . गुरुवारी चांदीच्या रथाला बैलजोडी जुंपून रथाची चाचणी करण्यात आली. माउलींच्या पालखी सोहळ्यासाठी रथ आणि बैलजोडी सज्ज झाली आहेत. तर, दुसरा जादाचा चांदीचा रथ पंढरपूरच्या संत नामदेव महाराज पालखी सोहळ्यास देण्यात येणार आहे.

कोरोनाच्या महामारीमुळे दोन वर्षे चांदीच्या रथातून पालखी सोहळा बहुसंख्येने नेण्यास मज्जाव केला होता. गेली दोन वर्षे एसटीने माउलींच्या पादुका पंढरपुरात आषाढी वारीसाठी नेल्या होत्या. यंदा मात्र कोरोनाची लाट ओसरल्याने पायी पालखी सोहळ्यास परवानगी दिली. संत ज्ञानेश्वर महाराज पालखी प्रस्थान मंगळवारी आळंदीतून होत आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी आळंदीतून सोहळा पंढरीच्या दिशेने मार्गस्थ होईल. माउलींची पालखी चांदीच्या रथात ठेवून सोहळा पुढे मार्गस्थ होणार आहे.