संजय राऊत आणि वसंत मोरे यांची भेट !राजकीय चर्चांना उधाण..
-नगरसेविका संगीता ठोसर यांच्या मुलाच्या लग्नात झाली भेट.
पुणे । लोकवार्ता
शिवसेना नेते संजय राऊत आणि मनसे नेते वसंत मोरे यांची पुण्यात भेट झाली आहे. एका लग्नसमारंभासाठी संजय राऊत पुण्यात असताना या दोघांची भेट झाली. त्यामुळे पुन्हा एकदा चर्चांना उधाण आले आहे. नगरसेविका संगीत ठोसर यांच्या मुलाच्या लग्नाच्या निमित्ताने संजय राऊत आणि वसत मोरे येथे आले होते. स्टेजवरून उतरताना संजय राऊत समोरून •आले आणि आपली गळाभेट घेतली असे मोरे म्हणाले. तात्यांना भेटणे आता दुर्मीळ झाले आहे, असे संजय राऊत आपल्याला म्हटल्याचे वसंत मोरे यांनी सांगितले. दरम्यान या भेटीत कोणतीही राजकीय चर्चा झाली नसल्याचे स्पष्टीकरण वसंत मोरे यांनी दिले आहे. लग्नसमारंभाच्या निमित्ताने येथे आल्याचे त्यांनी सांगितले.

संजय राऊत आणि वसंत मोरे एकमेकांना भेटल्यानंतर प्रथम राऊत मोरेंना तात्या म्हणाले. ठाण्यातील भाषण आपण ऐकल्याचे राऊत मोरेंना म्हणाले. तर वसंत मोरे म्हणून नाही, तर तात्या म्हणून ओळखले, असे राऊत म्हणाले. वसंत मोरे यांच्या कामाचे कौतुकदेखील त्यांना केले आहे. जाता जाता संजय राऊत मोरे यांना ‘भेटू’ असे म्हणाले. त्यामुळे मोरे आता शिवसेनेच्या जवळ आले की काय, अशा चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाल्या आहेत.