महाविकास आघाडी कडून महापालिका आयुक्तांना भेट; पत्राशेड वर कारवाई थांबवण्याची मागणी
पिंपरी । लोकवार्ता-
गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या नाशिकफाटा ते मोशी परिसरातील अनधिकृत पत्राशेडवर कारवाई संदर्भात महापालिकेने नोटीस दिल्या आहेत.याच संदर्भात आज पिंपरी- चिंचवड महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त श्री राजेश पाटील यांची भेट घेऊन या बाधित नागरिकांच्या अडचणी सांगितल्या. पत्राशेड वरील कारवाई थांबवून योग्य तो निर्णय घेण्याची मागणी महाविकास आघाडी कडून करण्यात आली. या बाधित नागरिकांना महामार्गापासून २५ फुटाच्या बाहेर कारवाई न करता दिलासा देऊन त्यांना उदरनिर्वाहापासून दुर करू नये , तसेच ज्यावेळी महामार्गाचे रुंदीकरण सुरू होईल त्यावेळी रुंदीकरणाने बाधित मिळकती नागरीक स्वतःहून काढून घेतील असे आश्वासन शिष्टमंडळाने आयुक्तांना दिले. यावर संबंधित विभागातील अधिका-यांशी चर्चा करून निर्णय घेऊ असे सांगण्यात आले.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष श्री अजित गव्हाणे, शिवसेना भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट, नगरसेवक रवि लांडगे, वसंत बोराटे, विक्रांत लांडे, राष्ट्रवादी काँग्रेस महिला शहराध्यक्ष कविता आल्हाट, भोसरी विधानसभा अध्यक्ष उत्तम आल्हाट, हरिभाऊ सस्ते, संतोष बोराटे, विजय सस्ते, गणेश सस्ते,वासुदेव आल्हाट, सुरेश बनकर, उदय तापकीर, संजय सस्ते,राहुल सस्ते , विशाल सस्ते, व बाधित नागरिक उपस्थित होते.