लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पिंपरी वाघेरे येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पामध्ये लॉटरी लागलेल्या सदनिकाधारकांना आमदार अण्णा बनसोडे यांच्या हस्ते चावी वितरीत

पिंपरी | लोकवार्ता-

पिंपरीवाघेरे येथील म्हाडाच्या गृहनिर्माण प्रकल्पातील सदनीकाधारकांना ताबा देण्यात आला. सदर प्रकल्पामध्ये १ हजार २३३ सदनीका आहेत. त्यामधील मध्यम उत्पन्न गटातील 595 सदनिका व उच्च उत्पन्न गटातील 340 सदनिका अशा एकूण 935 सदनिकांची सोडत काढण्यात आली होती. त्या सोडतीमध्ये यशस्वी झालेल्या प्रतिनिधिक सदनिकाधारकांना चावी वितरीत करण्याचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. 

उपमुख्यमंत्री  अजित दादा पवार यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे आयोजन केले होते मात्र काही कारणास्तव ते कार्यक्रमाला उपस्थित राहू शकले नाहीत. यावेळी पिंपरी विधानसभेचे आमदार अण्णा बनसोडे यांनी सर्व सदनिकाधारकांचे स्वागत केले. तसेच हा प्रोजेक्ट यशस्वी करण्यासाठी झटणारे पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे अधिकारी, म्हाडाचे अभियंते, व बी. जी. शिर्के कंपनीचे व्यवस्थापक व सर्व लहान मोठ्या कामगारांचे अभिनंदन केले.

यावेळी पुणे गृहनिर्माण व क्षेत्र विकास मंडळाचे मुख्य अधिकारी नितीन माने व बी. जी. शिर्के कंपनीचे वरिष्ठ व्यवस्थापक नितीन कदम यांनी या संपूर्ण प्रकल्पाची माहिती दिली. प्रकल्पामध्ये सर्व प्रकारच्या अत्याधुनिक सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. अतिशय उत्कृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने सर्व सदनिका धारकाच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत होते.

प्रातिनिधिक स्वरूपात राजेश्वर कुलकर्णी, रोहन प्रभू, शैलेंद्र धीवार, लक्ष्मी कोलते, सुधीर सावंत, रणजित कदम व इतर सदनिका धारकांना चावी देण्यात आली. आगामी काळात देखील जास्तीत जास्त लोकांना आपल्या घराचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी असे उत्तमोत्तम प्रकल्प उभारण्यासाठी आमदार म्हणून शक्य ती मदत करेल,असे आश्वासन पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे यांनी यावेळी दिले.

यावेळी कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती पिंपरी-चिंचवड महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील, एसआरएचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर, म्हाडाचे कार्यकारी अभियंता अनंत खेडकर, महानगरपालिकेच्या विद्यमान नगरसेविका उषा वाघेरे, निकिता कदम, संदीप वाघेरे, पौर्णिमा सोनवणे तसेच बी. जी. शिर्के कंपनीचे  प्रमोद पवार व इतर मान्यवर उपस्थित होते.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani