आमदार लक्ष्मण जगताप यांना डिस्चार्ज; कार्यकर्त्यांकडून धुमधडाक्यात स्वागत
-४० दिवसांचा लढा जिंकून परतले आमदार लक्ष्मण जगताप.
पिंपरी । लोकवार्ता
शहरातील भाजपचे चिंचवड विधानसभा आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय . त्यांचावर गेल्या 40 दिवसापासून पुण्याच्या खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते. अखेर आज उपचारानंतर त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलाय. आमदार लक्ष्मण जगताप यांना रुग्णालतून सोडण्यात आल्यावर त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोषात स्वागत करत फटाके फोडलेत, ते रुग्णालयात दाखल झाल्याची बातमी वा-यासारखी पसरली होती.

त्यानंतर राज्यभरातून सर्वपक्षीय नेत्यांसह शहरातील कार्याकर्ते, पदाधिकाऱ्यांनी रुग्णालयात धाव घेतली होती. कुटुंबीयांची भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली जात होती. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपते प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, केंद्रीय आरोग्यमंत्री भारतीताई पवार, माजी जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष्मण जगताप यांच्यासाठी जे महागड इंजेक्शन विदेशातून आणण्यासाठी मोठी मदत देखील केली होती.