आमदार लक्ष्मण जगताप आजारी असताना देखील ऍम्ब्युलन्स मधून विधानभवनात दाखल
-एक न एक मत महत्वाचे! आज विधान परिषदेचे मतदान होणार असून जीवाची पर्वा न करता आमदार लक्ष्मण जगताप विधान भवनाकडे रवाना
पिंपरी । लोकवार्ता
आज राज्यसभा निवणूक पार पडत आहे.सर्व पक्षीय नेते विधानभवनाकडे रवाना होत असून आमदार लक्समन जगताप येणार का नाही हा सर्वात मोठा प्रश्न होता?राज्यसभा निवडणुकीसाठी एकेक मत महत्त्वाचे आहे. राज्यसभेच्या निवडमुकीतील चुरस असल्याने जे आमदार आजारी आहेत, ज्यांना काही दिवसांपूर्वी अपघात झाले आहेत, ज्याचे ऑपरेशन झाले आहेत, अशा सगळ्यांनीच मतदान करावे यासाठी आदेश देण्यात आले आहेत. भाजपाचे आमदार लक्ष्मण जगताप याची काही दिवसापूर्वीच शस्त्रक्रिया झालेली असतानाही, त्यांनी मतदानासाठई यावे असा पक्षाने आग्रह धरला. त्यामुळे पिंपरी चिंचवडवरुन त्यांना कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून पिंपरी चिंचवडवरुन मुंबई विधाभवनाकडे निघाले आहेत.

आमदार लक्ष्मण जगताप हे मुंबईच्या दिशेने सकाळी रवाना झालेत, विधान परिषदेच्या मतदानासाठी ते जाणार की नाही असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून होता, अखेर ते कार्डियाक अॅम्ब्युलन्समधून मुंबईला निघालेत, गेल्या काही दिवसांपासून आजारी असलेले जगताप यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात होते उपचार सुरू आहेत. दीड महिन्याच्या उपचारानंतर त्यांना 2 जून रोजी त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता, विधान परिषदेच्या मतदानासाठी ते एअर अंबुलन्समधून जाणार असल्याची चर्चा होती. मात्र, डॉक्टरांच्या सल्ल्यानंतर हा निर्णय बदलण्यात आला असून त्यांना बायरोड घेऊन जाण्यात आलं.