सांगवी-किवळे रस्त्यावरील १३२ केव्ही ईएचव्ही लाइनचा टॉवर स्थलांतरीत करण्याचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते पडला पार
-महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला.
पिंपरी | लोकवार्ता-
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने प्रभाग क्र. २६ मधील सांगवी-किवळे रस्त्यावरील १३२ केव्ही ईएचव्ही लाइनचा टॉवर स्थलांतरीत करण्याचा शुभारंभ आमदार लक्ष्मण जगताप यांच्या हस्ते आणि महापौर उषा उर्फ माई ढोरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडला. यावेळी नगरसदस्य संदिप कस्पटे, नगरसदस्या आरती चोंधे, निर्मला कुटे, शारदा सोनवणे, माजी नगरसेवक विनायक गायकवाड आदी उपस्थित होते.

औंध रावेत रस्त्यावरील वाय जंक्शन ते औंध हॉस्पिटल दरम्यानच्या अती उच्चदाब वाहिनीमुळे (ईएचव्ही टॉवरलाइन) रहदारीस अडथळा निर्माण होत असल्याने ती वाहिनी स्थलांतरीत करण्याचा निर्णय महापालिकेच्या वतीने घेण्यात आला होता. या कामासाठी सुमारे ३ कोटी २० लाख रुपये खर्च करण्यात येणार आहेत अशी माहिती महापालिकेच्या अभियंत्यांनी दिली.
