लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

सकाळ सन्मान २०२२ चे मानकरी ठरले आमदार महेश लांडगे

-केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सन्मान.

पिंपरी | लोकवार्ता-

सकाळ’च्या ५१ व्या वर्धापनदिनानिमित्त ‘कनेक्टिंग डॉट्स’ संकल्पनेअंतर्गत सेवाव्रती संस्था आणि व्यक्तींप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी ‘सकाळ सन्मान सोहळा पार पडला. हा सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. २५) सायंकाळी ५ वाजता जुहू येथील मुकेश पटेल ऑडिटोरियममध्ये झाला. यावेळी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी प्रामुख्याने उपस्थित होते.त्याचसोबत सिनेसृष्टीतील अनेक दिग्गजांनी उपस्थिती लावली.

पिंपरी-चिंचवड शहरातील कोरोना काळात केलेल्या उल्लेखनीय कार्याचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांना सकाळ सन्मान २०२२ देण्यात आला.नैसर्गिक आपत्तीमध्ये माणुसकी जपणारे व कोरोना काळात सर्वांच्या मदतीला धावून जाणारे महेश लांडगे यांचे लोकवार्ता टीम कडून विशेष आभार.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani