पिंपरी चिंचवड मधील आत्मकेंद्री राजकारण्यांना आमदार महेश लांडगेंची अॅलर्जी
पिंपरी। लोकवार्ता-
आमदार महेश लांडगे… पिंपरी-चिंचवडच्या राजकीय पटलावरील उमदं आणि तितकच बहारदार व्यक्तीमत्व… अगदी मोकळा-ढाकळा असलेला हा माणूस. प्रचंड संघर्षातून पुढे आला. हा संघर्ष उभा करताना अनेकदा अपमान पचवावा लागला… तिकीट कापले…. पदासाठी प्रतीक्षा करावी लागली… तरी स्वत:शीच स्पर्धा करीत स्वत:चे नेतृत्व उभा करणारा स्वयंप्रकाशित नेता….. होय स्वयंप्रकाशितच…. अलिकडच्या काळात आत्मकेंद्री राजकारणाचा आधार घेतलेल्यांच्या सावलीला सुद्धा महेश लांडगे उभा राहत नाहीत… असा नेता जो पिंपरी-चिंचवड शहराचे राज्यात नेतृत्त्व करण्याची पूर्ण क्षमता आणि धमक ठेवतो. मात्र, शहरातील काही आत्मकेंद्री नेत्यांच्या डोळ्यांत आता महेश लांडगे खुपत आहेत.

महापालिका निवडणूक तोंडावर आत्मकेंद्री राजकारण करणारे दुकान उघडून बसले आहेत. त्यामध्ये मी काय केले…. किंवा काय करणार… विकासाचं काय बोलणार… यावर चकार शब्द न काढता. आमदार महेश लांडगे आणि भाजपा कशी चुकीची… ही सांगण्याची स्पर्धा किंवा चढाओढ लागली आहे. पाच वर्षे निद्रावस्थेत असलेल्या विरोधी पक्षातील राष्ट्रवादी काँग्रेसला सत्तेची स्वप्रे दाखवत कथित चाणक्य, बॉस अशी मंडळी कामाला लागली आहे. यातून हुकूमशाही, कार्यकर्त्यांवर, निष्ठावंतांवर अन्याय करणारा नेता… अशी विषपेरणी केली जात आहे. याला विषपेरणीच म्हणावे लागेल… कारण, हे विष उद्या पिंपरी-चिंचवडकरांच्या हिताच्या आड येण्याचा धोका आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापनेनंतर सुमारे ३७ वर्षांच्या काळात सुमारे ३० लाख लोकसंख्या असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये राज्याचे नेतृत्व करणारा एकही नेता तयार झाला नाही. अपवाद प्रा. रामकृष्ण मोरे. त्यानंतर दिवंगत अण्णासाहेब मगरांपासून माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगेंपर्यंत, माजी खासदार गजानन बाबरांपासून माजी आमदार विलास लांडेंपर्यंत अफाट क्षमता असलेल्या नेत्यांना केवळ शहरापुरते मर्यादित रहावे लागले. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने स्थानिक नेतृत्व राज्यात मोठे होवू दिले नाही, हाच खरा पिंपरी-चिंचवड शहराचा राजकीय इतिहास आहे.