पिंपरी चिंचवड शहराची वाटचाल कामगारनगरी ते क्रीडानगरी..!
यु मुंबा संघाचे कबड्डीपट्टू करतायत भोसरीमध्ये सराव..
आमदार महेश लांडगे व आयुक्त शेखर सिंह यांनी केली खेळाडूंशी चर्चा..
लोकवार्ता : भोसरीतील आंतरराष्ट्रीय कबड्डी स्टेडियममध्ये प्रो- कबड्डी लीग स्पर्धेतील यु-मुंबा संघाचे खेळाडू सराव करत असल्याने प्रशिक्षण काळात निवासी खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी काल आमदार महेश लांडगे यांनी केली.

‘भोसरी व्हिजन-२०२०’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमांतर्गत पिंपरी-चिंचवडची ओळख ‘स्पोर्ट्स सिटी’ अशी निर्माण व्हावी, असा संकल्प आमदार महेश लांडगे यांनी केला होता. त्यादृष्टीने शहरात अनेक प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. भोसरीतील आंतरराष्ट्रीय कबड्डी स्टेडियममध्ये प्रो- कबड्डी लीग स्पर्धेतील यु-मुंबा संघाचे खेळाडू सराव करीत आहेत. जागतिक पातळीवर प्रसिद्ध झालेल्या या स्पर्धांमधील खेळाडू पिंपरी-चिंचवडमध्ये प्रशिक्षण घेत आहेत. आगामी काळात स्पर्धाही निश्चितपणे आयोजित होतील, असा विश्वास आहे, असं आमदार महेश लांडगे यावेळी म्हणाले.
एक चायवाला ते कोण बनेगा करोडपती (video)
काल आमदार महेश लांडगे यांनी प्रशिक्षण काळात निवासी खेळाडूंना मिळणाऱ्या सुविधा आणि व्यवस्थेची पाहणी केली. खेळाडूंशी चर्चा केली. यावेळी महापालिका आयुक्त श्री. शेखर सिंह आणि संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.