भोसरीच्या विकास कामांबाबत आमदार महेश लांडगेंनी घेतली मुख्यमंत्र्यांची भेट
लोकवार्ता : भोसरी विधानसभा मतदार संघासह पिंपरी-चिंचवडमधील विविध प्रकल्प आणि विकासकामांबाबत राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. एकनाथजी शिंदे यांची भोसरी विधानसभेचे आमदार महेश लांडगे यांनी काल भेट घेतली.

यावेळी भोसरीचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी विविध विकास कामांबाबत सविस्तर निवेदन देण्यात आले. तसेच, संबंधित विभागाचे मंत्री मा. श्री. दादाजी भुसे, मा. श्री. अब्दुलजी सत्तार, मा. श्री. गुलाबरावजी पाटील यांच्याशी विविध मुद्यांवर सकारात्मक चर्चा करण्यात आली, असं आमदार लांडगे म्हणाले.
शिवबा प्रतिष्ठान व अक्षय माछरे फाउंडेशन आयोजित नवरात्रोत्सवाला दिमाखात सुरवात..!
याप्रसंगी आमदार महेश लांडगे म्हणाले कि, मुख्यमंत्री आणि मंत्री महोदय यांच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकल्प आणि विकासकामांना गती मिळेल, असा आमचा विश्वास आहे.