श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या गडकोट मोहिम समारोपात आमदार महेश लांडगे सहभागी
लोकवार्ता : दरवर्षी प्रमाणे यावर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान या संस्थेमार्फत भीमाशंकर ते शिवनेरी अशी तीन दिवस मोहीम पार पडली. या मोहिमेचा समारोप काल शिवनेरीवर झाला. या सोहळ्यात भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचा हि सहभाग होता.

त्याचबरोबर श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक भिडे गुरुजी, धनंजय भाई देसाई आणि महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आलेले धारकरी उपस्थित होते. छत्रपती शिवाजी महाराज आणि धर्मवीर संभाजी महाराज यांच्या विचारांची पिढी निर्माण व्हावी, तसेच गडकिल्ल्यांचे संवर्धन व्हावे हा या मोहिमेचा उद्देश आहे. या मोहिमेत हजारोंच्या संख्येने शिवभक्त उपस्थित होते.