लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

पंतप्रधानांकडून आमदार महेश लांडगेंच सांत्वन

लोकवार्ता : भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे देहावसन झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आमदार लांडगे यांचे सांत्वन केले असून, शोकसंदेश पाठवला आहे. आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई लांडगे यांचे दि. २४ सप्टेंबर रोजी निधन झाले. आज त्यांचा दशक्रिया विधी झाला. गेल्या दहा दिवसांत राज्यातील सर्वपक्षीय नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध संस्था- संघटनांचे प्रतिनिधी यांनी लांडगे यांच्या भोसरीतील निवासस्थानी सांत्वन भेट दिली आहे.

आमदार महेश लांडगेंच

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी शोकसंदेश पाठवला आहे. यासह राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, कॅबिनेट मंत्री चंद्रकांत पाटील, विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह सर्वपक्षीय आमदार, खासदार, नेते, पदाधिकारी यांनी लांडगे यांना मातृशोकाच्या दु:खातून सावरण्यासाठी आधार दिला.  

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani