आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपा आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधीमंडळात शपथविधी
लोकवार्ता : पुण्यातील कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीत विजयी झालेले महाविकास आघाडीचे आमदार रवींद्र धंगेकर आणि भाजपा आमदार अश्विनी जगताप यांचा आज विधीमंडळात शपथविधी झाला. विधीमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सध्या सुरू आहे. यावेळी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दोन्ही आमदारांना शपथ दिली.

चिंचवडमधील भाजपच्या आमदार अश्विनी जगताप यांनी आज पद आणि गोपनियतेची शपथ घेतली. कसब्याचे काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी देखील घेतली पद आणि गोपनियतेची शपथ.
शपथ घेताना रवींद्र धंगेकर म्हणाले की, मी प्रथम माझ्या कसबा विधानसभा मतदारसंघातील मतदारांना नमस्कार करतो. मी रवींद्र लक्ष्मीबाई उर्फ सुलोचना हेमराज धंगेकर विधानसभेचा सदस्य म्हणून निवडून आलो असल्याने.., असा उल्लेख करत धंगेकरांनी शपथ घेतली.