लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

आमदार शेळकेंनी धरणाला धोका निर्माण करत बुडवले १० कोटी

उत्खननामुळे नजीकच्या धरणाला धोका

लोकवार्ता । प्रतिनिधी

मावळ तालुक्यातील आंबळे गावी बेकायदा गौणखनिजाचे उत्खनन करून विद्यमान आमदार सुनील शेळके यांनी शासनाचा १० कोटी रुपयाचा महसूल बुडविला असल्याचा तर शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांनी १०० कोटी रुपयाची गफलत केली असल्याचा घणाघाती आरोप भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी येथे पत्रकार परिषदेत केला असून त्याची चौकशी करण्याची मागणी केली.

माजी खासदार सोमय्या यांनी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्या निवासस्थानी पत्रकार परिषद घेतली. यावेळी माजी राज्यमंत्री बाळा भेगडे, तालुका भाजप अध्यक्ष रवींद्र भेगडे हे उपस्थित होते.

शुक्रवारी सोमय्या यांनी अचानक आंबळे गावी बेकायदा गौण खनिजाचे उत्खनन चाललेल्या ठिकाणास भेट देऊन पहाणी केली. त्यांनंतर त्यांनी वडगाव मावळ येथील तहसील कचेरीत जाऊन मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांची भेट घेतली व बेकायदेशीर उत्खननाबाबत त्यांचे कडून माहिती घेतली. त्यात आंबळे गावातील दोन गटांना (१२५ व १५८) गौण खनिजाचे उत्खनाची परवानगी दिली असून बाकी पाहणीतील ८ गटात(१२१, १२३, १२४, १५४, १५३, १५२, १४९, १३६) बेकायदेशीर उत्खन्नन मोठ्या प्रमाणात चालू असल्याचे यावेळी सोमय्या यांनी त्यांचे निदर्शनास आणून दिले.त्यात त्यांनी मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या कडून बेकायदेशीर उत्खनन होत असल्याचा थेट आरोप केला.

यामध्ये शेळके व इतरांनी शासनाचा १० कोटी रुपयाचा महसूल बुडविला असून निसर्ग व पर्यावरण यांची हानी केली आहे. तर गौण खनिजाचे उत्खननामुळे नजीकच्या धरणाला देखील धोका निर्माण झाला असल्याचे सोमय्या यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. व पैशासाठी निसर्गाची छेडछाड बंद करावी, आपण तालुक्याचे लोक प्रतिनिधी आहात, संरक्षण करण्याची जबाबदारी आपली असून आपणच अनधिकृत कामे करत आहात, याची चौकशी केंद्र व राज्य सरकारच्या प्रदूषण महामंडळाकडून करावी अशी मागणी केली आहे.

याच पत्रकार परिषदेमध्ये सोमय्या यांनी शिवसेना खासदार भावना गवळी यांचेवर १०० कोटी रुपयाची आफरातफर केल्याचा आरोप करून राज्यातील ठाकरे सरकार कोविडचा फायदा घेउन मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करीत असल्याचा आरोप केला.

तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत त्यांनी कोरोना उपाय योजनेत सरकार कमकुवत असल्याचे सांगून रेल्वे लोकल सुविधा आणि शाळा याबाबत शासनाच्या धरसोड निर्णयाची सोमय्या यांनी खिल्ली उडवली.

किरीट सोमय्या यांनी मिळालेल्या अर्धवट माहितीच्या आधारे संबंधित आरोप केले असून याबाबत पत्रकार परिषदेत सविस्तर खुलासा करणार असल्याचे आमदार सुनील शेळके यांनी सांगितले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani