विधानसभेत आमदार सुनील शेळके यांना अश्रू अनावर
-लक्षवेधी कालपासून लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त.
पुणे | लोकवार्ता-
विधानसभेत राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यावर अक्षरशः रडायची वेळ आली आहे. लक्षवेधी कालपासून लावत नसल्यामुळे सुनील शेळके यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी बोलताना त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांच्या संदर्भातील विषयावर शेळके यांनी लक्षवेधी लावली होती. मात्र ती लागत नसल्यानं ते नाराज झाले.

आमदार सुनील शेळके म्हणाले की, जर पवना धरणामध्ये जमीन गेलेल्या शेतकऱ्यांचा यांनी विषय घेतला नाही. तर 2011 साली जे प्रकरण झालं होतं. याची पुन्हा पुनरावृत्ती होईल. कारण त्यावेळी जे आंदोलन झालं होतं ते याच विषयासाठी झालं होतं. त्यांनी सांगितलं की, अजित पवार यांची भेट घेतली त्यांनी मीटिंग लावण्याचं आश्वासनं दिलं आहे. विधानसभेत देखील मला मीटिंग लावण्याचं आश्वासन मिळालं आहे. त्यांना हा विषय मार्गी लावावाच लागेल, अन्यथा लढा उभा राहिल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा शेळके यांनी दिला.