लोकार्पणाच्या कार्यक्रमासाठी पंतप्रधान मोदी पिंपरी-चिंचवडला येणार!
१६ ऑगस्टचा मुहूर्त त्यासाठी निश्चित केला

लोकवार्ता । प्रतिनिधी
पुणे : पिंपरी चिंचवड ते दापोडी या मेट्रो मार्गाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात येणार आहे. १६ ऑगस्टचा मुहूर्त त्यासाठी निश्चित केला असल्याचे समजते.

महामेट्रोच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या संदर्भात पंतप्रधान कार्यालयाशी संपर्क साधला होता. मेट्रोचे भूमिपूजन मोदी यांच्या हस्ते झाले असल्याने या प्राधान्य मार्गाचे उद्घाटन व्हावे असा विचार यामागे आहे. पंतप्रधान कार्यालयाने यासाठी प्राथमिक संमती दिल्याची माहिती आहे. कोरोना टाळेबंदी व त्यानंतरच्या निबंधांमुळे मेट्रो कामाची गती संथ झाली आहे. मेट्रोला पुन्हा उभारी मिळावी यासाठीच लोकार्पणाचा कार्यक्रम मोदी यांच्या हस्ते करण्याचा प्रयल आहे.