“मोदींनी अनावरण केलेल्या शिवरायांच्या पुतळ्याच्या मेघडंबरीचा भाग तुटला”
-मेघडंबरीसोबत घडलेल्या दुर्घटनेबाबत अखेर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिल स्पष्टीकरण.
पुणे | लोकवार्ता-
रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं. मात्र या पुतळ्यावरील मेघडंबरीचा भाग तुटल्याचं सोमवारी संध्याकाळी उघडकीस आलं होतं. सजावटीचा भाग काढताना मेघडंबरीला धक्का लागून ते तुटल्याचा दावा महापालिकेने केला होता. मात्र उद्घाटनाची घाई केल्याचा आरोप काँग्रेस, मराठा सेवा संघ आणि राष्ट्रवादी काँग्रेसने केला होता. यावेळी भाजपविरोधात घोषणाबाजी करण्यात आली होती.

यांच्या मेघडंबरीसोबत घडलेल्या दुर्घटनेबाबत अखेर महापौर मुरलीधर मोहोळ यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. विद्युत रोषणाईच्या वेळी मेघडंबरीला धक्का लागला, त्यामुळे हा अपघात झाल्याचं मोहोळ यांनी म्हटलं आहे. दोन दिवसांमध्ये मेघडंबरीचा तो भाग लावण्यात येईल, असं पुण्याच्या महापौरांनी स्पष्ट केलं. मात्र यामध्ये राष्ट्रवादीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने गलिच्छ राजकारण केल्याचा आरोप महापौरांनी केला आहे. रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुणे दौऱ्यावर होते. यावेळी पुणे महापालिकेतील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या भव्य पुतळ्याचं मोदींच्या हस्ते उद्घाटन करण्यात आलं होतं.