“भ्रष्टाचारी भाजप चाले जाओ” चा नारा देत राष्ट्रवादीचा महापालिका भवनावर मोर्चा
-भ्रष्टाचारी भाजपाला जनता त्यांची जागा दाखवणार- अजित गव्हाणे
पिंपरी | लोकवार्ता-
भष्ट्राचारी भाजप चले जाव”, “अबकी बार सौ के पार” असा जोरदार घोषणाबाजी करत पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपच्या भ्रष्टाचाराविरोधात महापालिका भवनावर मोर्चा काढला. मोर्च्याला नागरिकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. राष्ट्रवादीचे नेते, सर्वसेलचे पदाधिकारी एकजुटीने मोर्चात सहभागी झाले होते.सत्ताधारी भाजपाला जनता त्याची जागा दाखून देणार असं म्हणत जोरदार शब्दप्रहार अजित गव्हाणे यांनी केला.

चिंचवड स्टेशन ते महापालिका भवनापर्यंत काढलेल्या या मोर्चात पक्षाचे पदाधिकरी व हजारो कार्यकर्ते सहभागी झाले होते. शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मोर्चात पिंपरीचे आमदार आण्णा बनसोडे, भोसरीचे माजी आमदार विलास लांडे, विरोधी पक्षनेते राजू मिसाळ, महिला शहराध्यक्ष कविता अल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, माजी शहाराध्यक्ष संजोग वाघेरे, कार्याध्यक्ष जगदीश शेट्टी, राहुल भोसले, प्रशांत शितोळे, माजी महापौर, समन्वयक योगेश बहल, मंगला कदम, वैशाली घोडेकर, अपर्णा डोके, शकुंतला धराडे, नगरसेवक डब्बू आसवानी, मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, मयुर कलाटे, शाम लांडे विनोद नढे, विक्रांत लांडे, पंकज भालेकर, नगरसेविका वैशाली काळभोर, संगीता ताम्हाणे, पोर्णिमा सोनवणे, सुलक्षणा धर, आजी-माजी नगरसेवक, नगरसेविका असे हजारो कार्यकर्ते मोर्चात सहभागी झाले होते.