“पुण्यभूमी मोशी” मोशी च्या इतिहासाचा दस्तऐवज – आ. महेशदादा लांडगे
Lokvarta – डिजिटल मार्केटिंग व माध्यम क्षेत्रातील प्रतिथयश कंपनी रे क्रिएशन च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या पुण्यभूमी मोशी या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना महेश दादा लांडगे बोलत होते यावेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ बारणे प्रसिद्ध लेखक नितीन थोरात व डॉ. प्रकाश कोयाडे उपस्थित होते.
मोशी-
या भागाचा आमदार म्हणून यापूर्वी काहींनी काम केले आहेत माझ्या नंतरही कोणीतरी या पदावर असेल परंतु मी काम करत असताना असे कोणतेही काम करणार नाही की, ज्यामुळे माझ्या मतदारांना किंवा मला शरमेने मान खाली घालावी लागेल असे मत पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे अध्यक्ष व भोसरी विधानसभेचे आमदार महेशदादा लांडगे यांनी व्यक्त केले.
डिजिटल मार्केटिंग व माध्यम क्षेत्रातील प्रतिथयश कंपनी रे क्रिएशन च्या माध्यमातून प्रकाशित करण्यात आलेल्या पुण्यभूमी मोशी या पुस्तकाचे प्रकाशन करत असताना महेश दादा लांडगे बोलत होते यावेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ बारणे प्रसिद्ध लेखक नितीन थोरात व डॉ. प्रकाश कोयाडे उपस्थित होते.

यावेळी बोलताना महेश दादा लांडगे म्हणाले की मी केलेल्या कामासंदर्भात काही जण टीका करत आहेत परंतु मी कधीही कोणावरही टीका केलेली नाही तसेच मी माझ्या कार्यकर्त्यांनाही सांगत असतो की आपण आपले काम करत राहायचे कोणावरही टीका करायची नाही. मला माहित आहे की कधी ना कधी या पदावरून आपल्याला दूर व्हावे लागणार आहे त्यामुळे मी जनसेवेचे काम करत असताना माझ्या कडून कोणतीही चूक होऊ देत नाही.

महेश दादा पुढे म्हणाले की मोशी येथील नागेश्वर महाराज उत्सव हा सामाजिक ऐक्याचे प्रतीक आहे येथील भंडाऱ्याचा कार्यक्रम नक्कीच अनुभवला पाहिजे. ज्या एकोप्याने व सामाजिक सलोख्याने हा उत्सव साजरा होतो त्याचा मोशीतील प्रत्येकालाच अभिमान आहे. पुण्यभूमी मोशी हे पुस्तक म्हणजे मोशी चा इतिहासाचा दस्तऐवज आहे रे क्रिएशनने केलेल्या या प्रयत्नात काही उणीवा असण्याची शक्यता आहे मोशी करांनी ते पुस्तक परिपूर्ण व्हावे यासाठी यामध्ये ज्या गोष्टी उल्लेख केल्या गेल्या पाहिजे त्याची माहिती द्यावी म्हणजे हे पुस्तक परिपूर्ण करता येऊ शकेल असेही महेश दादा लांडगे यांनी यावेळी सांगितले.
माझ्या कन्येच्या विवाहप्रसंगी मला माझ्या भावना व्यक्त करणे अवघड झाले होते परंतु अविनाश आदक यांनी माझ्या भावना त्यांच्या शब्दात गुंफले व त्या भावना ध्वनीचित्रमुद्रित करून ती ध्वनीफीत प्रसारित केली राज्याच्या कानाकोपऱ्यात पोहोचली.
कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ बारणे यांनी रे क्रिएशन या पुस्तकाच्या निर्मितीसाठी घेतलेला मेहनती बद्दल त्यांचे कौतुक केले जवळपास पंधरा हजार पुस्तके मोशी परिसरात वाटण्यात आली असून पाच हजारांहून अधिक वाचकांनी डिजिटल प्रति डाउनलोड केल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. लेखक नितीन थोरात यावेळी बोलताना म्हणाले की, आमदार महेश दादा लांडगे सामाजिक कार्यकर्ते संतोष भाऊ बारणे व रे क्रिएशन या तिघांच्या संयुक्तिक प्रयत्नांमुळे पुण्यभूमी मोशी या पुस्तकाची निर्मिती झाली आहे, मोशीकरांनी पिंपरी चिंचवड शहरात आलेल्या लोकांना राहण्यासाठी स्थान निर्माण करून दिले त्याबद्दल नितीन थोरात यांनी मोशीकरांचे धन्यवाद या वेळी व्यक्त केले.

डॉ. प्रकाश कोयाडे यावेळी बोलताना म्हणाले की महेश दादा सारख्या माणसाचे काम मी अनुभवले आहे त्यांना भेटण्याची मला ओढ होती परंतु आज पुण्यभूमी मोशीच्या प्रकाशनाच्या निमित्ताने ही संधी मला मिळाली या शहराच्या साठी म्हणून जे जे चांगले काम करता येईल ते आपण निश्चित करू असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
यावेळी पुस्तकातील मुलाखतकार सागर हिंगणे, भानुदास आल्हाट, चंद्रकांत तापकीर, मंगेश हिंगणे, निखिल बोऱ्हाडे, निलेश बोराटे, राजेश सस्ते, शिवाजी आल्हाट, वंदना आल्हाट, विजय रासकर आदींचा गौरव करण्यात आला त्याचबरोबर मोशीची कन्या मंजुश्री शिंदे भागवत यांची सहसंचालक कृषी अधिकारी म्हणून पदोन्नती झाल्याबद्दल त्यांचाही विशेष गौरव यावेळी करण्यात आला.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक रे क्रिएशनचे संचालक अविनाश आदक यांनी तर आभार प्रदर्शन प्रमोद सस्ते यांनी केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भाऊसाहेब कोकाटे यांनी केले. यावेळी मोठ्या संख्येने मोशी ग्रामस्थ कार्यक्रमास उपस्थित होते.