लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“मोशी सायकलिस्ट ग्रुप तर्फे आज एकादशी निमित्त वारकर्यांना अल्पउपहार”

मोशी ।लोकवार्ता-

हा वारकरी साप्रंदाय आपणांस समाजात कळत नकळत जगणं शिकवतो पिढ्या न पिढ्या चालत आलेली मराठी संस्कृतीचा वारसा आपणांस देऊन जातो संपूर्ण विश्वाला शांततेचा संदेश देणारे संत ज्ञानेश्वर जगतगुरू तुकाराम महाराज यांच्या दिव्य वाणीतून प्रकट झालेले संत साहित्य हे फक्त काव्य नसून ती जगण्याला आकार देणारी संकल्पना आहे महाराष्ट्राच्या अस्मितेत आणि अभिमानात भर घालणारा वारकरी संप्रदाय प्रत्येक मराठी जनांच्या मनात मानबिंदू ठरतो विठ्ठल आणि हरिनामाचा न थांबणारा जयघोष आणि त्यात तल्लीन होऊन स्वतःला काही दिवस विसरून ज्यावेळी वारकरी सर्वांबरोबर एक होतो त्यावेळी त्याच्या विकारी म्हणजेच दोषांनी भरलेल्या मनाची मशागत होत असते भजन आणि त्याच्या जोडीला टाळ आणि मृदुंगाचा लयबद्ध नाद कानाला एक सुखद आनंद देऊन जातो सफेद शर्ट आणि पायजमा त्याबरोबरच प्रत्येकाच्या डोक्यावर टोपी हा वेष ऐक्याचे प्रतीकच म्हणावे लागेल स्त्री पुरुष समानतेचं एक अत्युच्च असं दर्शन आपणास ह्या वारीच्या सोहळ्यामध्ये पाहावयास मिळते वारी मध्ये प्रत्येक वारकरी एकमेकांना माऊली या नावाने संबोधतो खरं म्हणजे साक्षात विठ्ठलाची उपमा प्रत्येक वारकरी अनुभवत असतो मनातील अहंकार,द्वेष आणि मत्सर गळून पडण्याची एक प्रक्रिया ह्या वारीतून पार पडत असते.


भाव विचार वाणी आणि कृती ह्या चार अवस्थेमधून मानवाचं कर्म उमटत असतं ह्या चारी गोष्टींमध्ये जो परिपक्व बनण्याचा सातत्याने प्रयत्न करीत राहतो त्याच्या वाट्याला येणारे कर्म हे उच्च प्रतीचचं असतं वारकरी संप्रदाय आपणास हेच शिकवत असतो कारण तो स्वतःला विसरून पांडुरंगाच्या नामस्मरणात तल्लीन झालेला असतो त्याचे विचार शुद्ध असतात ह्या प्रवासामध्ये वाईट विचार त्यांच्या मनाला शिवणार देखील नाहीत कारण तेथील प्रत्येक वारकरी हा एकच विचाराने एकत्र आलेला असतो त्यानंतर येते वाणी.. माऊली माऊली चा गजर भजन अभंग ह्यात न्हाऊन गेलेल्या वारकऱ्यांच्या वाणीतून येणारा प्रत्येक शब्द हा आदराचा च असतो.


असा हा वारकरी रस्त्यावरून पायी चालत असताना क्षणभर त्याला विसावा भेटावा त्याची तहान भुक भागावी त्यांच्या पायावर नतमस्तक होऊन आपल्यातही ते संस्कार रूजावेत येणार्या युवा पिढीपुढे एक नवा आदर्श रहावा या उद्देशाने दरवर्षी प्रमाणे ह्या वर्षी देखील फुल ना फुलाची पाकळी म्हणून मोशी सायकलिस्ट ग्रुप तर्फे आज एकादशी निमित्त वारकर्यंना अल्पउपहार देण्यात आला आम्हाला सार्थ अभिमान आहे आम्ही या ग्रुपचा भाग आहोत संपुर्ण भारत मातेवर आलेलं हे रोगराई च संकट लवकर टळो व असेच सत्कार्य सर्वांच्या हातो घडो.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani