मोशीमध्ये दोन कंपन्यांना लागली आग ; साडेतीन कोटींचं नुकसान
लोकवार्ता : मोशीतील दोन कंपन्यांना सकाळी ७ वाजता आग लागून जाळून खाक झाल्या. या आगीत कंपनीचे साडेतीन कोटींचे नुकसान झाले आहे. दोन सिलेंडरचा स्फोट होऊन ही आग लागली असून कोणतीही जीवित हानी झाली नसल्याची माहिती महापालिकेच्या अग्निशामक विभागाचे प्रमुख विमोचन बाळासाहेब वैद्य यांनी दिली.

‘अमिगा टेकनाक्राफ्ट’ आणि “एसपीए इंजिनीरिंग’ या दोन कंपन्यांना ही आग लागली होती. याबाबत एका व्यक्तीने सकाळी 7 वाजता अग्निशमन विभागाला फोन करून कळवले. या कंपन्या पुणे-नाशिक हायवेवरील जय गणेश साम्राज्य चौककडून चऱ्होलीला जाणाऱ्या रस्त्याजवळ आहेत. ही आग भीषण असल्यामुळे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या अग्निशमन विभागाचे 7 बंब घटनास्थळी पोहोचले. यामध्ये मुख्य केंद्राचे 2 बंब व भोसरी, प्राधिकरण, तळवडे, चिखली व॒ थेरगाव केंद्राचे प्रत्येकी एक बंब होते. तसेच 22 ते 23 कर्मचारी ही आग विझवण्यासाठी होते.