लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

प्राधिकरणातून महापालिकेत वर्ग केलेल्या मिळकतींना किचकट प्रक्रियेतून वगळा

चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनची पालिकेकडे मागणी

मोशी : प्राधिकरणातून महापालिकेत वर्ग केलेल्या मिळकतींना किचकट प्रक्रियेतून वगळा. पिंपरी चिंचवड नवनगर विकास प्राधिकरण बरखास्त केल्यानंतर शासन निर्णयानुसार प्राधिकरणातील सर्व विकसित मालमत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेत वर्ग करण्यात आल्या आहेत. प्राधिकरणाचे पूर्वीचे मालमत्ता हस्तांतरण करतानाचे नियम, शुल्क, प्रशासकीय नियम कायम ठेवल्याने मालमत्ता धारकांना किचकट प्रक्रियेतून जावे लागत आहे. ही किचकट प्रक्रिया वगळून संपूर्ण प्रक्रिया पिंपरी चिंचवड मनपा आयुक्तांनी सुलभ करावी, अशी मागणी चिखली-मोशी-पिंपरी चिंचवड शहर हाऊसिंग सोसायटी फेडरेशनचे संजीवन सांगळे यांनी केली.

प्राधिकरणातील सोसायटीधारक, बंगलोधारक आणि फेडरेशन प्रतिनिधींची बैठक नुकतीच पार पडली. सध्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत असणाऱ्या मालमत्ता हस्तांतरण करताना जी प्रक्रिया, हस्तांतरण शुल्क याबाबत जे नियम आहेत, तेच नियम सध्या प्राधिकारणाकडील मालमत्ता पिंपरी चिंचवड मनपाकडे वर्ग केलेल्या आहेत त्यांना असावेत. असं फेडरेशनचे अध्यक्ष संजीवन सांगळे म्हणाले. जे नियम पिंपरी चिंचवड मनपातील मालमत्ताना लागू आहेत तेच नियम आता प्राधिकारणातून पिंपरी चिंचवड महानगरपालिकेकडे वर्ग केलेल्या मालमत्ताना लागू करावेत. तेच नियम असावेत, यासाठी फेडरेशनकडून पिंपरी चिंचवड मनपा प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार आहे.

जर प्राधिकारणातील मालमत्ता हस्तांतरण करताना पूर्वीचे किचकट नियम व पूर्वीप्रमाणेच हस्तांतरण शुल्क भरावे लागत असतील तर मग या सर्व मालमत्ता पिंपरी चिंचवड महापालिकेकडे वर्ग करून काय फायदा झाला, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केला. याबाबत आमदार महेश लांडगे यांना स्वतंत्र निवेदन देणार असल्याचे संजीवन सांगळे म्हणाले. तसेच शासनस्तरावर देखील याचा पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले.

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani