लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

“मोशी ग्रामस्थांचा लोकाभिमुख उपक्रम”

-मोशी ग्रामस्थांच्या वतीने एम आय डी सी पोलीस ठाण्याला ५० ट्रॅफिक बॅरीकेट भेट

मोशी । लोकवार्ता-

महाशिवरात्रीपासून सुरू होणा-या श्री नागेश्वर महाराज यात्रेनिमित्त मोशी ग्रामस्थांच्या वतीने मोशी ग्रामस्थांच्या वतीने लोकाभिमुख उपक्रम राबवण्यात आला आहे. मोशीमधील वाहतूक कोंडी पाहता हा उपक्रम नागरिकांनी राबवला आहे . एम आय डी सी पोलीस ठाण्याला ५० ट्रॅफिक बॅरीकेट देण्यात आले. मोशीतील वाहतूक सुरळीत होण्याच्या कामासाठी या बॅरीकेटचा उपयोग होणार आहे. आतापर्यंत मोशी ग्रामस्थ विविध उपक्रम राबवितात. भंडारा यात्रेनिमित्त महाप्रसादासाठी महाराष्ट्रातील अनेक ठिकाणाहून भाविक येत असतात त्यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत असते.

वाहतूक नियंत्रण, दर्शन बारी , विविध सण यासाठी या बॅरीकेटचा उपयोग होईल. यावेळी मोशीतील ग्रामस्थ उपस्थित होते.एम आय डी सी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी गवारी, पोलीस निरीक्षक पाटील, उपनिरीक्षक अमरदिप पुजारी उपस्थित होते.बॅरीकेट दिल्याबद्दल वरिष्ठ पोलीस निरीक्षक गवारी यांनी ग्रामस्थांचे आभार मानले.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani