“भोसरी विधानसभेचे आमदार मा. महेश लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त मोशीत रंगला होम मिनिस्टर चा कार्यक्रम “
-नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
मोशी ।लोकवार्ता-
भोसरी विधानसभेचे मा.आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्त्या वंदना हिरामण आल्हाट यांच्या वतीने आयोजित होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा कार्यक्रम काल रविवार दि.२८\११\२०२१ सा. ६ वाजता जुना मोशी- आळंदी रस्ता,लक्ष्मीनगर दक्षिण स्वप्नलोक सोसायटी शेजारी मोशी येथे आनंद पूर्ण वातावरणात पार पडला.

मोशीतील सामाजिक कार्यकर्त्या वंदना हिरामण आल्हाट व हिरामण पोपट आल्हाट यांच्या वतीने आमदार महेशदादा लांडगे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित केलेल्या होम मिनिस्टर खेळ रंगला पैठणीचा या कार्यक्रमास भोसरी विधानसभेचे लोकप्रिय आमदार मा.श्री. महेश दादा लांडगे ,शिवांजली सखी मंचच्या अध्यक्षा पुजा ताई लांडगे, व सन्माननीय लोकप्रतिनिधी, भाजपचे सर्व पदाधिकारी यांनी उपस्थिती लावली.

विजेत्यांना मिळाली आकर्षक बक्षीसे…
कार्यक्रमात ५ लकी ड्रॅा विजेत्यांना पैठणी व ३ लकी विजेत्यांना सोन्याची नथ बक्षिसे देण्यात येणार आहेत. त्यामध्ये विजेत्यांना प्रथम क्रमांक पिठाची गिरणी, द्वितीय क्रमांक एल ई डी टीव्ही,, तृतीय क्रमांक ओव्हन, चतुर्थ क्रमांक वॉटर प्युरीफाय , पाचवा क्रमांक मिक्सर अशी बक्षिसे तसेच, पाच लकी ड्रॉ मधील विजेत्यास मानाची पैठणी मिळाली आहे. शिवाय प्रत्येक सहभागी महिलेस आकर्षक भेटवस्तु देण्यात आल्या आहे. सर्व महिलांनी खेळात सहभागी होऊन या खेळाचा आनंद घेतला.
