मोशीत ‘कर्तव्यम योगा शिबीर’ उत्साहात साजरा
उद्योजक संतोष बारणे यांचा स्तुत्य उपक्रम

लोकवार्ता । प्रतिनिधी
मोशी : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त मोशीतील सिल्वर 9 सोसायटीमध्ये योग दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्योजक तसेच सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे यांच्या माध्यमातून कर्तव्यम सोशल फाउंडेशन च्या वतीने कर्तव्यम योगा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी, योगा विषयात पी एच डी केलेल्या धनश्री जाधव यांनी उपस्थितांना विविध योगा प्रकार करून दाखविले तसेच मार्गदर्शन केले. यावेळी उद्योजक व सामाजिक कार्यकर्ते संतोष बारणे, कर्तव्यम फाउंडेशन चे राकेश गायकवाड, कर्तव्यम फाउंडेशन महिलाध्यक्षा भारती डोंगरे, सचिन बारणे, शिवाजी बारणे, शाम मरके, सतिश खरात, संदीप पाटील, योगेश चौधरी, सागर बोगाडे, सतीश देवकर, गणेश मांडे, सुनील सावंत, भागवत कुशल बरहाटे, दिनकर मुरलीधर तांबे तसेच सिल्वर नाईन, प्रिस्टीन ग्रीन्स व मोशी परिसरातील विविध सोसायटीतील नागरिक उपस्थित होते.
