खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात; निवास्थानी कडक बंदोबस्त
लोकवार्ता : मावळचे खासदार श्रीरंग बारणे शिंदे गटात गेल्याने त्यांच्या थेरगाव येथील निवास्थानी आणि संपर्क कार्यालयाबाहेर पोलिसांचा कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. शिवसेनेने बंडखोरी केल्यांनतर महाराष्ट्रात भाजप आणि शिवसेना शिंदे सरकार स्थापन झालं. त्यानंतर हळूहळू शिवसेनेचे खासदए शिंदे गटात गेले. एकूण १२ खासदार शिवसेना शिंदे गटात असून आता फक्त ६ खासदार उद्धव ठाकरे यांच्याकडे राहिले आहेत.

पिंपरी-चिंचवड. मावळ आणि पनवेल, उरण, खालापूर या भागातील खासदार श्रीरंग बारणे यांनी ही शिंदे गटात प्रवेश केला आहे. हे सलग दोन वेळा मावळ लोकसभा मतदार संघातून निवडून आले आहेत. मतदारसंघातून निवडून आले आहेत. पिंपरी-चिंचवड शहरात खासदार बारणे यांची ताकद आहे. त्यांचे पुतणे नगरसेवक राहिलेत. त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे पिंपरी-चिंचवड शहर युवासेना प्रमुख आहेत. पिंपरीचे माजी आमदार गौतम चाबुकस्वार, आकुर्डीतील माजी नगरसेवक प्रमोद कुटे, वाकड भागातील माजी नगरसेविका रेखा दर्शिले, महिला संघटिका उर्मिला काळभोर, माजी शहरप्रमुख योगेश बाबर हे खासदार बारणे यांचे समर्थक आहेत. त्यामुळे बारणे शिंदे गटात गेल्याने शिवसेनेला हा मोठा धक्का मानला जात आहे. याबाबत बोलताना खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, “शिवसेना गटनेतेपदी राहुल शेवाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवाळे यांच्या नियुक्तीला मी पाठिंबा दिला आहे. संसदीय कामामध्ये राहुल शेवाळे यांची जास्त सहकार्याची भूमिका राहिली आहे. त्यामुळे मी त्यांना पाठिंबा दिला आहे. आम्ही सगळे शिवसेनेशी संलग्न आहोत”.
खासदार श्रीरंग बारणे का गेले शिंदे गटात?
मावळ लोकसभा मतदारसंघाचे श्रीरंग बारणे सलग दोनवेळा लोकसभेत प्रतिनिधीत्त करत आहेत. मावळ लोकसभा मतदारसंघ पुणे आणि रायगड जिल्ह्यात विभागला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघात पिंपरी, चिंचवड, मावळ आणि रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, खालापूर हे मतदारसंघ येतात. मावळ मतदारसंघात शिवसेना-भाजपची समान राजकीय ताकद आहे. सर्वाधिक मतदारसंख्या असलेल्या चिंचवड, पनवेल विधानसभा मतदारसंघात भाजपचा आमदार आहे. कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे, अलिबागचे आमदार महेंद्र दळवी हे शिंदे गटात गेले. पिंपरी आणि मावळात राष्ट्रवादीचे आमदार आहेत. मावळात राष्ट्रवादीचा आमदार असला. तरी, भाजपची संघटनात्मक ताकद आहे. त्यामुळे आगामी 2024 च्या लोकसभा निवडणुकीचा विचार करुन खासदार बारणे यांनी भाजपसोबत युती केलेल्या शिवसेना बंडखोर नेते एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाणे पसंत केल्याची चर्चा आहे. हा निर्णय घेऊन खासदार बारणे यांनी 2024 मध्ये पुन्हा दिल्लीत जाण्याचा मार्ग सुकर केल्याचे बोलले जात आहे.