थेरगावची कन्या झाली नायब तहसीलदार
लोकवार्ता : महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोग परीक्षेत यश प्राप्त करून नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल थेरगांव येथील तमन्ना शेख व तिच्या कुटूंबाचा सत्कार पिंपरी चिंचवड ॲडव्होकेटस् बार असोशिएशन चे मा ॲाडिटर ॲड. धनंजय मगन कोकणे व परिवरा तर्फे करण्यात आला .

२०२१-२२ मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षेमध्ये तमन्ना शेख यांनी यश मिळवले. तिची नायब तहसीलदार पदी निवड झाली.
तमन्ना शेख या थेरगांव मधील आनंदवन सोसायटी येथील रहवासी आहेत त्यांनी अगदी बिकट परीस्थिती कुठेच क्लास न लावता परिक्षेची तयारी केली. त्यांच्या यशाचे सर्व क्षेय त्यांनी त्यांच्या कुटूंबाला दिले .ॲड . कोकणे व कुटूंबाने त्यांचे शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात व पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.