आयुक्त साहेब ! डांगे चौक येथील ग्रेड सेपरेटरचे चुकीच्या पद्धतीचे काम त्वरित थांबवावे….
यामध्ये ठेकेदारांकडून मोठी चुकी झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही

लोकवार्ता|प्रतिनिधी
पिंपरी : डांगे चौक, थेरगाव येथील वाहतूक नियंत्रण राहावे म्हणून ग्रेड सेपरेटरचे काम महानगरपालिकेच्या माध्यमातून मंजूर करण्यात आले होते. महानगरपालिकेचे कोट्यवधी रुपये खर्च करून हा प्रकल्प उभारण्यात येत आहे परंतु तयार करण्यात येणारे ग्रेड सेपरेटरचे दोन्ही बाजूचे रस्त्याची रुंदी जुळून येत नाही व ग्रेड सेपरेटरच्या मूळ डिझाईन मध्ये बदल करण्यात आले आहे हे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.म्हणजेच एका बाजूने रस्त्याला दाबण्यात आले आहे.
यामध्ये ठेकेदारांकडून मोठी चुकी झाली असल्याची शक्यता नाकारता येत नाही ज्याच्यामुळे प्रवास करणाऱ्या वाहनांना धोका निर्माण होऊ शकतो व महानगरपालिका तिजोरीला देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकते.
याची गंभीर दखल घेत वृक्ष प्राधिकरण समितीचे सदस्य अजिंक्य बारणे यांनी आयुक्त राजेश पाटील यांनी या कामाची प्रत्यक्ष पाहणी करावी व प्रकल्पाशी संबंधित अधिकारी व ठेकेदार यांची चौकशी करून दोषी आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई अशी मागणी केली आहे.