मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी!मुंबईकरांना मिळणार आता एका दिवसाचं लोकल तिकिट.
वैद्यकीय कारणांमुळे ज्या लोकांना लस घेता येत नाही अशांनाही रेल्वे प्रवासासाठी मिळणार पास.
मुंबई | लोकवार्ता-
करोना प्रादुर्भावामुळे दीर्घकाळापासून थांबलेल्या मुंबई लोकलला आता मोठा दिलासा मिळाला आहे. प्रादुर्भाव कमी झाल्याने सरकारने टप्प्याटप्प्याने लोकल रेल्वे सुरू तर केली, मात्र त्यासाठी महिन्याभराचा पास काढणं बंधनकारक करण्यात आलं होतं. एका दिवसाच्या प्रवासासाठीचं तिकीट मिळत नव्हतं. पण आता लसीकरण पूर्ण होऊन १५ दिवस झालेल्या व्यक्तींना लोकलचं तिकीट मिळणार आहे.

राज्य सरकारने लोकलची तिकीट विक्री बंद करून सर्वांना फक्त मासिक पास देण्याचे आदेश मध्य आणि पश्चिम रेल्वेला दिले होते. मात्र त्यामुळे गेले काही दिवस प्रचंड गोंधळ आणि संताप बघायला मिळाला होता. रेल्वेने ही बाब राज्य सरकारच्या लक्षात आणून दिल्या नंतर राज्य सरकारने पुन्हा एक पत्र रेल्वेला लिहिले आहे. या पत्रात लसीकरण पूर्ण झालेल्या, अत्यावश्यक सेवेत असलेल्या किंवा नसलेल्या, अशा सर्वच प्रवाशांना एक दिवसीय तिकीट देण्यात यावे अशी विनंती केली आहे.