मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवास महागणार; १ एप्रिलपासून नवे टोल दर लागू
लोकवार्ता : महागाई, इंधनदर, गॅसची दरवाढ यामुळे सर्मसामान्यानंचे कंबरडे मोडले आहे. दिवसोंदिवस सर्वसामान्यांच्या खिशाला खर्चाची कात्री लागताना दिसत आहे. यातच आता मुंबई-पुणे महामार्गावरील प्रवासही महागणार आहे. मुंबई-पुणे महामार्गावरील टोल दरांत मोठी वाढ करण्यात येणार असल्याचं सांगितलं जात आहे.

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेचा प्रवास आणखी महागणार आहे. १ एप्रिल २०२३ पासून द्रुतगती माग्रावर प्रवास करणाऱ्यांना टोलसाठी १८ टक्के अधिक रक्कम मोजावी लागणार आहे. सन २००४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाकडून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाच्या टोलमध्ये दर तीन वर्षांत १८ टक्के वाढ करण्याची अधिसूचना काढण्यात आली होती. त्यानुसार, २०२३ मधील टोलच्या दरात वाढ होत आहे. १ एप्रिल २०२३ ला लागू होणारे टोलचे दर हे २०३० पर्यंत कायम असतील, असं एमसआरडीकडून सांगण्यात आलं आहे.