लोकवार्ता

निष्पक्ष निर्भीड पारदर्शक

महापालिका प्रशासनाने नियमितेकरणाला दिली मुदत वाढ

-महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी दिली माहिती.

पुणे | लोकवार्ता-

पुणे महापालिकेच्या हद्दीत अनेक नागरिकांनी अनाधिकृतपणे पणे बांधकामे केली आहेत. बेकायदेशीररित्या बांधण्यात आलेल्या या बांधकामांसाठी गुंठेवारीतील घरे नियमितीकरणाला देण्यात आलेली मुदत संपली. १० जानेवारीला सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेची मुदत 31 मार्चला संपली आहे. मात्र महापालिका प्रशासनाने या नियमितेकरणाला पुन्हा मुदत वाढ दिली आहे.आता 30 जूनपर्यंत मुदत वाढ देण्यात आल्याची माहिती महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी माहिती दिली आहे. महापालिकेने या मोहिमेला आतापर्यंत केवळ 77 नागरिकांनी प्रतिसाद दिला आहे.

पुणे महापालिका हद्दीतील गुंठेवारी त्यानंतर आता त असलेली अनाधिकृत घरे नियमित करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात आली. त्यासाठी १० जानेवारी ते 31 मार्चपर्यन्त प्रस्ताव दाखल करण्याची मुदत दिली होती ३० जूनपर्यंत वाढवण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत आतापर्यंत फक्त 77 प्रस्ताव दाखल झाले आहेत. बांधकाम नियमावलीतील अटींमुळे छोट्या भुखंडांवर महापालिकेची परवानगी घेउन घरे बांधण्यात अडचणी येत असल्याने सर्वसामान्य नागरिकांनी अनधिकृतपणे ही बांधकामे केली आहेत. यापैकी जी घरे नियमान्वित होऊ शकतात, त्यांचे नियमितीकरण करण्यासाठी राज्य शासनाने गुंठेवारी कायद्यान्वये ती शुल्क आकारून अधिकृत करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.

https://lokvarta.in/

एका क्लिक मध्ये शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!
या मकर संक्रातीला करा असा हटके लूक। marathi makar sankranti look म्युच्युअल फंड म्हणजे काय ? mutualfunds health insurance घेणं कितपत फायद्याचं आहे ? कोल्हापुरातील top १० nonveg हॉटेल्स जयपुरात सजली मराठी अप्सरा | sonalee kulkarani