महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूका लांबणीवर !
-नवीन आराखडा तयार करण्यासाठी अधिकाऱ्यांमध्ये गोंधळ निर्माण.
पिंपरी । लोकवार्ता-
महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणूक आता पुन्हा लांबणीवर गेल्या आहेत. निवडणुकांचे सर्व अधिकार राज्य सरकारणाने स्वतःकडे घेतले आहेत. त्यामुळे जुन्या प्रभाग रचना रद्द करण्यात आल्या. मुदत संपलेल्या महानगरपालिकांच्या प्रारूप प्रभाग रचनेचा कच्चा आराखडा तयार करण्याचे आदेश नगर विकास विभागाने दिला. त्यामुळे आता २२ महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका लांबणीवर पडणार आहेत. निवडणूक आता किमान सप्टेंबरपर्यंत पुढे जातील असं चिन्ह दिसतंय.

नवा आराखडा करायचा म्हणजे नेमकं करायचं काय? त्यासाठी किती वेळ लागेल, याबाबत काहीच स्पष्ट नसल्याने अधिकारी वर्गात गोंधळ उडाला आहे. राज्यात पिंपरी चिंचवड सह विविध महानगरपालिकेच्या निवडणूका होणार होत्या. येत्या २१ जूनला ओबीसी आरक्षणाबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे या निवडणूक जूनमध्ये होण्याची शक्यता कमी आहे.
पुणे आणि पिंपरी-चिंचवडसह राज्यातील काही महापालिकांसाठी प्रारूप प्रभाग रचना आराखडा तयार करण्याचे आदेश राज्याच्या नगरविकास विभागाने दिले होते. त्यानुसार महापालिकेने १७३ नगरसेवकांसाठी ५८ प्रभागांचा प्रारूप आराखडा केला होता.
आता महापालिकेनला नव्याने आराखडा कारण्यासाठी किमान दीड ते दोन महिन्याचा कालावधी लागू शकतो. त्यामुळे निवडणुका आणखी पुढे जातील, यात शंका नाही.