सर्व नागरिकांना लस देण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील
निळू फुले नाटय मंदिर येथे नविन कोविड १९ लसीकरण केंद्राचे

लोकवार्ता।प्रतिनिधी
पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने निळू फुले नाटय मंदिर येथे नविन कोविड १९ लसीकरण केंद्राचे उद्धाटन महापौर माई ढोरे यांच्या हस्ते पार पडले. त्यावेळी उपस्थित लाभार्थींना शुभेच्छा देताना त्यांनी मत व्यक्त केले. शहरातील सर्व नागरिकांना कोविड १९ प्रतिबंधात्मक लस देण्यासाठी महापालिका सतत प्रयत्नशील आहे, असे प्रतिपादन महापौर माई ढोरे यांनी केले.

महापौर माई ढोरे म्हणाल्या पिंपरी चिंचवड मधील कोरोना बाधितांची संख्या दिवसेंदिवस कमी होत आहे ही समाधानकारक बाब असली तरी सर्व नागरिकांनी लसीकरण करुन घेणे गरजेचे आहे. तसेच कोरोना विषाणुस प्रतिबंध करण्यासाठी मास्कचा वापर, सॅनिटायझर तसेच हात स्वच्छ साबणाने धुणे आवश्यक आहे. आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनानुसार पिंपळे गुरव, काटेपुरम, सांगवी आदी भागातील नागरिकांना कोविड १९ लसीकरणाची सुविधा मिळावी यासाठी हे नवीन लसीकरण केंद्र उभारण्यात आले आहे.
यावेळी नगरसदस्य अंबरनाथ कांबळे, नगरसदस्या माधवी राजापुरे, सिमा चौगुले, माजी नगरसदस्य शंकर जगताप, राजेंद्र राजापुरे, माहिती व जनसंपर्क विभागाचे प्रफुल्ल पुराणिक उपस्थित होते.